कोपरगाव : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या २०२५-२६ च्या भरतीचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छा

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या २०२५-२६ च्या भरतीचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या तीन विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आरती राजेंद्र जगताप, मेघा विजय वाघमारे व कांचन बाबासाहेब वाघमारे यांनी घवघवीत यश मिळवत ‘खाकी वर्दी’चे स्वप्न साकार केले आहे.
आरती जगताप हिची संभाजीनगर पोलीस दलात, तर मेघा वाघमारे हिची बीड पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच कांचन वाघमारे हिची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी हे यश मिळविले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (मुली) प्रमुख प्रा. वर्षा आहेर यांनी सांगितले की, संबंधित तिन्ही विद्यार्थिनी एनसीसीच्या छात्र सैनिक असून त्या अनुक्रमे तृतीय वर्ष कला, तृतीय वर्ष वाणिज्य व पदव्युत्तर प्रथम वर्ष या वर्गांत शिक्षण घेत आहेत.
या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव दादा कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त संदीप रोहमारे तसेच प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशासाठी कॅप्टन नितीन शिंदे व लेफ्टनंट वर्षा आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS