Homeताज्या बातम्या

डायल ११२ चा गैरवापर; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एकावर कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

कोपरगाव शहर : तालुक्यातील शिरसगाव येथे गुटखा विक्री सुरू असल्याची खोटी माहिती 'डायल ११२' वर देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद

ऊसतोडणीसाठी पळवून आणलेल्या मजुराचा अपघाती मृत्यू; मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून मुकादम पसार
भाजीपाल्याच्या नावाखाली ‘पुष्पास्टाईल’ खैराची तस्करी; वसईत ७-८ किलोमीटर पाठलाग करून टेम्पो जप्त
जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; बेट-कोपरगाव येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
डायल 112 वर फेक कॉल कराल तर खबरदार; दाखल होईल आता गुन्हा! Vardha Marathi  News | Beware if you make a fake call on Dial 112; Crime will be filed now!  |

कोपरगाव शहर : तालुक्यातील शिरसगाव येथे गुटखा विक्री सुरू असल्याची खोटी माहिती ‘डायल ११२’ वर देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर छगन भागवत (रा. सावळगाव, ता. कोपरगाव) याने ३१ जुलै रोजी ‘डायल ११२’ वर कॉल करून शिरसगाव येथील एका दुकानात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार युवराज खुळे यांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट दिली. सागर भागवत याने दाखविलेल्या ठिकाणी दोन पंचांच्या उपस्थितीत शिरसगाव बसस्थानकासमोरील ‘प्रियंका जनरल स्टोअर्स’ या दुकानाची झडती घेण्यात आली; मात्र तपासादरम्यान दुकानात कोणताही गुटखा किंवा अन्य प्रतिबंधित पदार्थ आढळून आला नाही.

त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, दुकानमालकाने उधारीवर वस्तू देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने सागर भागवत याने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी पोलीस अंमलदार युवराज खुळे यांच्या फिर्यादीवरून सागर छगन भागवत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निजाम शेख करत आहेत.

“डायल ११२ हा आपत्कालीन सेवेसाठीचा क्रमांक आहे. त्यामुळे यावर खोटी माहिती देणे, विनाकारण कॉल करणे किंवा गैरवापर करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा कृत्यांची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून डायल ११२ चा वापर फक्त वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा.”

— संभाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक, कोपरगाव तालुका)

COMMENTS