Homeताज्या बातम्या

कोतूळमध्ये त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन

अकोले: कोतूळ (ता. अकोले) येथील संत सावता महाराज मंदिरात त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. रामनाथ महाराज जाधव, ह.भ.प. नितीन

जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन; बेट-कोपरगाव येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
महागाई वाढीमुळे रेपो दर ‘जैसे थे’!
शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या बेपर्वाईमुळेच शिक्षक मोरे आत्महत्या प्रकरण घडले? शिक्षण विभागाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
संत सावता माळी मंदिर - sant sahitya - charitra mahiti abhang gatha granth  rachana - sant sahitya - charitra mahiti abhang gatha granth rachana

अकोले: कोतूळ (ता. अकोले) येथील संत सावता महाराज मंदिरात त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. रामनाथ महाराज जाधव, ह.भ.प. नितीन महाराज गोडसे आणि ह.भ.प. हिम्मत महाराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि. ९) पासून सप्ताहास प्रारंभ होणार असून, मंगळवार (दि. ११) रोजी सांगता होणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत काकडा आरती, दुपारी दोन ते तीन वाजता नेमाचे भजन, सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ, रात्री सात ते नऊ हरिकीर्तन आणि रात्री दहा ते बारा हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहात ह.भ.प. आत्माराम महाराज बटवाल (जुन्नर), ह.भ.प. ओंकार महाराज बाबर (अहिल्यानगर), ह.भ.प. वाल्मिक महाराज गिते (नाशिक) आणि ह.भ.प. अनंत महाराज काळे (मेंढवन) यांची कीर्तने होणार आहेत. मंगळवारी (दि. ११) दुपारी दोन ते पाच या वेळेत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत सावता महाराज तरुण मित्र मंडळ आणि श्री संत सावता महाराज सप्ताह नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS