Homeताज्या बातम्या

विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर तरुणावर गुन्हा

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर राहुरी पोलिस ठाण्यात साहिल पठाण याच्यावर गंभीर कलमांख

राहाता शहरात महात्मा फुले यांना अभिवादन
रायतळेत हायमास्ट सोलर पोलची तातडीने उभारणीचोरीच्या घटनेनंतर आ. दाते यांची त्वरित दखल
उघड्या गटारीत दुचाकीस्वार कोसळलाअकोले-संगमनेर मार्गावर दुर्घटना ; धोकादायक ठिकाणाबाबत नागरिकांत संताप
डॉक्टर पित्याच्या प्रयत्नांना दहा महिन्यांनंतर यश; तरुणाच्या  आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर राहुरी पोलिस ठाण्यात साहिल पठाण याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सातत्याने होत असलेल्या कथीत पाठलाग, छेडछाड, मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी साहील सिकंदर पठाण याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना घडून आठ दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली होती. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकलव्य आदिवासी सेनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन दिले होते. आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा ६ ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्या समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. आदिवासी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर राहुरी पोलिसांनी या विद्यार्थीनीच्या वडिलांना बोलावून घेत तक्रार नोंदवून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. फिर्यादीनुसार आरोपी साहील सिकंदर पठाण हा या मुलीचा वारंवार पाठलाग करीत होता. शाळेच्या परिसरात, गावात तसेच ये-जा करताना तिचा छळ केला जात होता. यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. या सततच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS