Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत गावठी कट्टा, काडतुसे, मोबाईल फोन व कार असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोटुंबे आखाडा ते शनिशिंगणापूर मार्गावर संशयित इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उंबरे (ता. राहुरी) येथील हॉटेल माऊली परिसरात सापळा रचून संशयित वाहन अडविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन जण आढळले. त्यांची चौकशी केली असता विशाल वसंत पालवे (वय २८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) व सोमनाथ भानुदास मोरे (वय ३२, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) अशी नावे निष्पन्न झाली. पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे एक जिवंत व एक मिसफायर काडतूस, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व सुमारे ५ लाख रुपये किमतीची सुझुकी कार असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
चाकूने वार करून रॉबरी करणारा आरोपी जेरबंद; बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
कौटुंबिक वादातून मारहाण; जावयाचा मृत्यू; पत्नी अटकेत, सासूवरही संशय

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत गावठी कट्टा, काडतुसे, मोबाईल फोन व कार असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोटुंबे आखाडा ते शनिशिंगणापूर मार्गावर संशयित इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उंबरे (ता. राहुरी) येथील हॉटेल माऊली परिसरात सापळा रचून संशयित वाहन अडविण्यात आले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन जण आढळले. त्यांची चौकशी केली असता विशाल वसंत पालवे (वय २८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) व सोमनाथ भानुदास मोरे (वय ३२, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) अशी नावे निष्पन्न झाली.

पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे एक जिवंत व एक मिसफायर काडतूस, २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व सुमारे ५ लाख रुपये किमतीची सुझुकी कार असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

COMMENTS