Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश नाईकांनी उंटाचा मुका घ्यायचा प्रयत्न करू नये; नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल- युवा सेना बीड संघटक प्रमुख निलेश थोरात

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथित स्वरूपात करण्यात आलेल्या टीकेनंतर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा;विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर बीड जिल्हा घडविण्याचा संकल्प – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
सम्राट चौधरी बनले बिहारचे 24 वे मुख्यमंत्रीविजय चौधरी व विजेंद्र यादव उपमुख्यमंत्री
‘मिसिंग लिंक’ 1 मेपासून होणार सुरू

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथित स्वरूपात करण्यात आलेल्या टीकेनंतर बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना पदाधिकार्‍यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
युवासेना बीड जिल्हा प्रमुख गणेश शिराळे, युवा सेना बीड संघटक प्रमुख निलेश थोरात, उपशहर प्रमुख तेजस शेटे तसेच इतर पदाधिकार्‍यांनी एकत्रितपणे प्रतिक्रिया देत, राज्यातील जबाबदार पदांवर असलेल्या नेत्यांबाबत बोलताना संयम राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांसाठी 24 तास उपलब्ध राहणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व आहे. अशा व्यक्तिमत्त्वावर खालच्या पातळीवरील टीका होणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या वक्तव्यांमुळे स्थानिक राजकीय वातावरणात चर्चा सुरू झाली असून विविध राजकीय कार्यकर्त्यांमध्ये यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या प्रकरणात संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे, तर काहींनी राजकीय भाषेच्या मर्यादा पाळण्याची गरज अधोरेखित केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात लक्ष ठेवले जात असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS