Homeताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर : ३१ मे १७२५ ते १३ ऑगस्ट १७९५ हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कालखंड अत्यंत संघर्षशील होता. त्यांचे

शासनाच्या योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन
मुदखेड काँग्रेस कमिटी कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात

श्रीरामपूर : ३१ मे १७२५ ते १३ ऑगस्ट १७९५ हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कालखंड अत्यंत संघर्षशील होता. त्यांचे चरित्र आणि कार्य चिरंतन असून, त्यांचा जीवन इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असे मत अ‍ॅड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन तथा माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील यशवंत नागरी पतसंस्थेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शेळके बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मधुकर सातव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सोहळ्यात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील कविता सादर करून उपस्थितांना ‘लॉकडाऊनच्या कविता’ हे पुस्तक भेट दिले.

प्राचार्य शेळके यांनी पुढे बोलताना सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पाणी, रस्ते, घाट, विहिरी, बारव, रस्त्यांच्या कडेला झाडे आणि पक्षी संरक्षण व्यवस्था यांसारखी सर्वसामान्य लोकांसाठी केलेली अद्वितीय कामे सदैव स्मरणीय ठरतात. तसेच, संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाशील वृत्तीमुळेच यशवंत नागरी पतसंस्था आज नावलौकिक मिळवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला चेअरमन साहेबराव रक्टे, जनरल मॅनेजर माधवराव निंबाळकर, ऑडिटर शरद संकपाळ, लक्ष्मणराव निकम, मेजर कृष्णा सरदार यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी चेअरमन साहेबराव रक्टे यांनी आभार मानले.

COMMENTS