Homeताज्या बातम्या

साबला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा ‘महिला सन्मान पुरस्कारा’ने गौरव

केज : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, मुंबई यांच्या आदेशानुसार साबला येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन
अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात
पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा

केज : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग, मुंबई यांच्या आदेशानुसार साबला येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच जनाबाई नरहरी काकडे, ग्रामपंचायत सदस्या आश्रुबाई श्रीमंत काकडे आणि पार्वती महादेव नाईकनवरे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

या जयंतीचे औचित्य साधून गावातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य विषयक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुनिता अशोक काकडे, अनिता रामराजे शिंदे, छायाबाई बारीकराव काकडे, मंगल बालाजी काकडे, आशाबाई अंकुश मुळे, राधा राम काकडे, सारिका विजय नाईकनवरे, सुरेखा विष्णू कटारे, सुरेखा श्रीराम राऊत, आम्रपाला सुधीर सरवदे, मिरा संभाजी घाडगे आणि आरती अनिल सरवदे या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अंगणवाडी मदतनीस वैशाली सरवदे, केशरबाई सरवदे, ऋतुजा नाईकनवरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, पोलीस पाटील अविनाश गुलाब काकडे, समाजसेवक नरहरी काकडे, रामराजे शिंदे, गणेश कटारे, अशोक काकडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS