Homeताज्या बातम्या

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात

जामखेड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश

पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा
अहिल्यादेवींच्या जयंतीपूर्वी चोंडी मार्गाची दुरुस्ती करा; रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांची मागणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन

जामखेड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची आजच्या समाजाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवात ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी या न्यायप्रियता आणि शक्तीचे मूर्तिमंत प्रतीक होत्या. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात सहन करूनही त्यांनी खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या दूरदृष्टीची ओळख करून देण्यासाठी शासनाने ‘गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ आयोजित केली होती.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अहिल्यादेवींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी २८ वर्षांच्या कार्यकाळात भक्कम न्यायव्यवस्था उभी केली, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला आणि माहेश्वरी वस्त्रउद्योगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती केली. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. प्रास्ताविकात प्रा. राम शिंदे यांनी तीन दिवसीय जयंती महोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

COMMENTS