Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये रंगला ओलीस नाट्याचा थरार ; रोहित आर्यचा एन्काउंटर

मुंबई ः मुंबईत गुरूवारी दुपारी पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये ओलीस नाट्याचा थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी तासाभरातच 20 ओलीस असलेल्या मुलांची सुटक

महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना  सारिका क्षीरसागर यांची उपस्थिती
किनवटच्या जंगलात ’स्लो पॉयझन’; रसायनांच्या इंजेक्शनने ’धवाडा’ वृक्षांची कत्तल! वनअधिकारी आणि परप्रांतीय व्यापार्‍यांचे साटेलोटे? शिवसेनेसह निसर्गप्रेमींचा आंदोलनाचा इशारा
नांदेड जिल्ह्यात अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; 140 गुन्हे दाखल, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

मुंबई ः मुंबईत गुरूवारी दुपारी पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये ओलीस नाट्याचा थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी तासाभरातच 20 ओलीस असलेल्या मुलांची सुटका केली, मात्र ओलीस ठेवणार्‍या रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. छातीत डाव्या बाजुला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या त्याचा मृतदेह सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आला
गुरुवारी दुपारी 1:45 वाजता मुंबईतील पवई परिसरातील रा स्टुडिओमध्ये युट्यूबर रोहित आर्यने 20 हून अधिक मुलांना ओलीस ठेवले. घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि विशेष कमांडोंनी बाथरूममधून प्रवेश केला आणि आरोपीला ताब्यात घेत असतांना झालेल्या चकमकीत पोलिसांनी रोहित आर्यचा एन्काउंटर केला.

COMMENTS