Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालत्या कारवर दरड कोसळून महिलेचा मृत्यू

रायगड : रायगडमध्ये चालत्या कारवर दरड कोसळून दरडीचा दगड थेट कारवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली आहे. ही घटना ताम्हिणी घाट पर

मनपा पथकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक करा, धिंड काढा-कर्मचार्‍यांचा संताप उसळला; खडकपुरा-वाघी रोडवरील घटनेचा तीव्र निषेध; मनपा प्रवेशद्वारासमोर निषेध सभा
डक दाम्पत्याच्या भाजपप्रवेशाचा गाजावाजा नेमका कुणासाठी?महायुतीत नवा संघर्ष पेटणार? नांदेड उत्तरवर भाजपची पुन्हा नजर
सत्यपाल महाराज प्रबोधनाच्या वाटवेळावरील अखंड दीपस्तंभ; धोबी समाजाच्या वतीने महाराजांचा वाढदिवस साजरा

रायगड : रायगडमध्ये चालत्या कारवर दरड कोसळून दरडीचा दगड थेट कारवर पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली आहे. ही घटना ताम्हिणी घाट परिसरात घडली आहे. अवकाळी पावसामुळे डोंगरकड्यावरून छोटे-मोठे दगड कोसळत आहेत. याच दरम्यान पुण्याहून माणगावकडे जाणार्‍या कारवर डोंगरावरून कोसळलेला दगड थेट कारच्या सनरूफमधून आत घुसला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराती असे असून, त्यांचे पती आणि मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी स्नेहल गुजराती आपल्या कुटुंबासह पुणे-रायगड जोडणार्‍या ताम्हिणी घाटातून प्रवास करत होत्या.

COMMENTS