Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर दिवसा दुकानांमध्ये महिलेचे दागिने ओरबडले

कर्जत : जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे शिवदत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन;
बा..विठ्ठला सर्वांना सुखी, समृद्ध कर
प्राथमिक शिक्षक बँक सभासदांना देत असलेल्या सुविधा दिशादर्शक व आदर्शवत : आनंद भंडारी 
Displaying 1003045321.jpg

कर्जत : जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे शिवदत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी पाण्याची बॉटल खरेदी करण्याचे निमित्त करत महिला व्यापारी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

 याबाबत घडलेली घटना अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील श्री दत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये तीन तारखेला दुपारी चार वाजता रोहिणी रवींद्र शेळके या महिला व्यापारी दुकानांमध्ये होत्या. त्यावेळी दुचाकी वर दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुकानांमध्ये आले. व पिण्याच्या पाण्याची बॉटल मागितली. पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी चोरट्याने पन्नास रुपये दिले. महिला व्यापाऱ्यांनी पैसे पन्नास रुपये घेऊन ते गल्ल्यात टाकून सुट्टे पैसे देत असताना चोरट्याने त्या संधीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याची दागिने ओरबडले आणि साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेला.

COMMENTS