Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये महार

जल जीवन मिशन योजनेसाठी आमरण उपोषण
शेवगावच्या प्रश्‍नांसाठी विधानसभेत हक्काच्या माणसाची गरज ः  नरेंद्र घुले पाटील
दहा लाखांची मदत घेऊन सून पसार; सासू-सासरे वा-यावर l DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात 17 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींचा शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने 70 कुटुंबांचे प्राण वाचवले. बी-विंगमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताच, करिनाने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडरजवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली. तिच्या शौर्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे 13 वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केयाला 10 महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी या आजाराने ग्रसित आहे, ज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हीलचेअरवर असते. मात्र, तिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. तिच्या कार्याची दखल घेवून तिला पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी 14 राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील 17 मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये 7 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे. बाल पुरस्कार सात श्रेणींमध्ये दिले जातात. ज्यामध्ये कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. यासोबतच महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर यांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

COMMENTS