Homeताज्या बातम्याअहमदनगर

कर्जत तालुक्यात डिजिटल जनगणनेस प्रारंभ

कर्जत : शासनाच्या निर्देशानुसार कर्जत तालुक्यात दि. १ मेपासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ झाला असून प्रशासनाने या मोहिमेसाठी व्यापक तयारी सुरू

कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
जनगणनेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह?नागरिकांकडून माहिती लपविण्याचे प्रकार, प्रगणकांवर दबाव असल्याची चर्चा
जलसंपदा कार्यालय स्थलांतराच्या निर्णयाला न्यायालयाची मान्यतागोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळाविरोधातील याचिका फेटाळली

कर्जत : शासनाच्या निर्देशानुसार कर्जत तालुक्यात दि. १ मेपासून डिजिटल जनगणना मोहिमेला प्रारंभ झाला असून प्रशासनाने या मोहिमेसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील प्रत्येक घर, कुटुंब रचना, सदस्यांची माहिती तसेच मूलभूत सुविधांचा तपशील या जनगणनेत नोंदविला जाणार आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन स्वयं गणना करून या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नायब तहसीलदार महादेव कारंडे यांनी दादा पाटील महाविद्यालयात आयोजित तालुकास्तरीय पर्यवेक्षक प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात केले.जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी नसून शासनाच्या विविध विकास योजना, निधी वाटप, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार आणि सामाजिक कल्याण योजनांच्या नियोजनासाठी महत्त्वाची आधारव्यवस्था मानली जाते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.दोन टप्प्यांत होणार जनगणना जनगणनेचा पहिला टप्पा दि. १ मे ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात नागरिकांना स्वयंनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नागरिकांनी ३४ प्रश्नांची माहिती भरावयाची असून नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा युनिक कोड जतन करून ठेवणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात दि. १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. स्वयंनोंदणी केलेल्या नागरिकांना केवळ युनिक कोड प्रगणकाला दिल्यास प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कारंडे यांनी स्पष्ट केले. “जनगणना ही केवळ आकडेवारी नसून शासनाच्या धोरणनिर्मितीची भक्कम पायाभरणी आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीवर भविष्यातील विकास योजना आणि सुविधा अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येकाने अचूक, प्रामाणिक आणि संपूर्ण माहिती देत या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,” –  महादेव कारंडे, नायब तहसीलदार, कर्जत

COMMENTS