Homeताज्या बातम्या

तांत्रिक चुकीमुळे ४ कोटी ७२ लाखांची रक्कम परत; देवळाली प्रवरा शाखेतील ६६० शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित

देवळाली प्रवरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ पात्र शेतकऱ्यांच्या

नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात दाम्पत्यासह नदीत कोसळली कार.
Mangalvedha : ट्रॅक्टर – मोटारसायकलचा भीषण अपघात… एकाच जागीच मृत्यू … (Video)
Maharashtra Farmer Loan Waiver Extension CM Order | शेतकरी कर्जमाफीची  व्याप्ती वाढणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

देवळाली प्रवरा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ७२ हजार ५५९ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तब्बल ६ अब्ज ९७ कोटी ८१ लाख २५ हजार १३९ रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. मात्र, जिल्हा सहकारी बँकेच्या देवळाली प्रवरा शाखेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची सुमारे ४ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम तांत्रिक कारणामुळे वर्ग न होता शासनाकडे परत गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीअंतर्गत येणारे तब्बल ६६० पात्र शेतकरी पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.

महाराष्ट्र शासन आणि महाआयटीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन अपलोड करण्याचे काम करण्यात आले. जिल्हा सहकारी बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची एक्सेल शीट ऑनलाइन अपलोड करताना तांत्रिक चूक झाल्याने देवळाली प्रवरा शाखेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची रक्कम वर्ग होऊ शकली नाही.

प्रक्रियेत तांत्रिक चूक झाल्यामुळे ४ कोटी ७२ लाखांची रक्कम परत गेली आहे. याबाबत ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला असून, दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.”दरम्यान, राहुरी सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, झालेली तांत्रिक चूक दुरुस्त करून महाआयटीमार्फत संबंधित रक्कम परत पाठविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होण्याची अपेक्षा असताना तांत्रिक चुकीमुळे ६६० शेतकरी पहिल्या टप्प्यात वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम प्रत्यक्षात खात्यावर कधी जमा होते, याकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोट “देवळाली प्रवरा शाखेला कर्जमाफीची रक्कम वर्ग झाली नसल्याचे शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आले. ऑनलाइन शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून हालचाली सुरू करण्यात आल्या. याबाबत महाराष्ट्र बँकेशी ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ही रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.” अशी माहिती यांनी दिली.

  • जयंत देशमुख, जनरल मॅनेजर, जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर

कोट एसबीआयच्या काही खातेदारांची रक्कम नागपूरकडे वर्ग दरम्यान, एसबीआयच्या काही खातेदार शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम नागपूरकडे वर्ग झाल्याची बाबही समोर आली आहे. अशा खातेदारांची यादी उपलब्ध असून, संबंधित शेतकऱ्यांनी राहुरी सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधून आपला संपर्क क्रमांक नोंदवावा, जेणेकरून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करता येईल.

  • दत्ता कडुपाटील, शिवसेना (उबाठा) श्रीरामपूर विधानसभा तालुका प्रमुख

COMMENTS