Homeताज्या बातम्या

श्रावणात जलाभिषेकासाठी शनी चौथरा खुला स्थानिकांसाठी सुविधा ; इतर भाविकांसाठी चौथऱ्याखालून नियमित दर्शन व्यवस्था

सोनई : पवित्र श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था, शिंगणापूर यांच्या वतीने स्थानिक भाविकांच्या प्रथा व परंपरांचा

अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले; मध्यपूर्वेत वाढला तणाव
HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
ओबीसी नेते श्री. गणेश बनकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Shani Shingnapur temple entering sanctum sanctorum Ahmednagar News |  Ahmednagar News : शनिशिंगणापूर चौथऱ्याचं दर्शन भाविकांसाठी बंद? मंदिर  देवस्थानाकडून माहिती समोर

सोनई : पवित्र श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था, शिंगणापूर यांच्या वतीने स्थानिक भाविकांच्या प्रथा व परंपरांचा विचार करून दर्शन व जलाभिषेकाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. दि. १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या श्रावण मासाच्या कालावधीत शिंगणापूर व पंचक्रोशीतील स्थानिक भाविकांना दररोज पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत चौथऱ्यावर जाऊन श्री स्वयंभू शनिदेव महाराजांच्या मूर्तीस जलाभिषेक करता येणार आहे अशी माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली.

श्रावण महिन्यात शनिदेवाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक शिंगणापूर येथे दाखल होत असतात. या काळात होणारी गर्दी, स्थानिक धार्मिक परंपरा आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन देवस्थान विश्वस्तव्यवस्थेने दर्शन व जलाभिषेकासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे.

शिंगणापूर व पंचक्रोशीबाहेरील भाविक तसेच कोरड्या वस्त्रातील इतर सर्व भाविकांसाठी चौथऱ्याखालील नियमित दर्शन व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. अशा भाविकांना निर्धारित नियमित दर्शन मार्गावरून श्री शनिदेव महाराजांचे दर्शन घेता येणार आहे.

त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांनी चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न न करता देवस्थान प्रशासनाने निश्चित केलेल्या दर्शन मार्गाचा वापर करावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

“श्रावण मासाच्या निमित्ताने शनिदेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि स्थानिक धार्मिक परंपराही अबाधित राहावी, यासाठी देवस्थान विश्वस्तव्यवस्थेने केलेल्या या नियोजनामुळे दर्शन व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.” – अतुल चोरमारे (कार्यकारी अधिकारी, श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था, शनिशिंगणापूर)

COMMENTS