Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘विकसित महाराष्ट्र 2047’ कडे राज्याची वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत 2047 कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, प्रधानमंत्री नरेंद्र म

विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल !
नांदेड विभागाने पूर्णा डिपोवर वॅगन तपासण्या वाढवून मालवाहतूक कार्यक्षमता सुधारली
भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक भरारी; चीनसोबत वाढले व्यवहार

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत 2047 कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा ‘1 ट्रिलियन डॉलर्स’ अर्थव्यवस्थेचा वाटा असेल. राज्य शासनाने तयार केलेले ‘विकसित महाराष्ट्र 2047 हे व्हिजन डॉक्युमेंट राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवेल, असा विश्‍वास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रीय सहभाग सुनिश्‍चित करुन सर्वसमावेशक, प्रगत आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करुया, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. उपस्थितांनी राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने ध्वजाला मानवंदना दिली. राज्यपाल वर्मा यांनी जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

गुंतवणुकीत वाढ आणि रोजगारांची उपलब्धता
राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्राने जागतिक गुंतवणुकदारांचा विश्‍वास संपादन केला आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तब्बल 31 लाख 25 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्याच्या नवीन उद्योग आणि गुंतवणूक धोरणातून 70.5 लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असून, त्यातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी राजशिष्टाचार विभागात स्वतंत्र ‘परकीय थेट गुंतवणूक’ कार्यासने निर्माण करून प्रशासकीय गती वाढवली आहे.

बळीराजाला बळ आणि सौर उर्जेचा विश्‍वविक्रम
शेतकरी कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना राज्यपालांनी नमूद केले की, खरीपात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या एक कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 15 हजार 950 कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली आहे. तसेच चालू रब्बी हंगामात नुकसानग्रस्त एक लाख 80 हजार शेतकर्‍यांना 128 कोटी रुपयांची मदत दिली आहे. बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकर्‍यांना 50 हजार 914 कोटी रुपये इतकी पीक कर्जाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

COMMENTS