Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई दराचा नीचांक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यापासून किरकोळ महागाईचा दर हा 8 वर्षातील सर्वोच्च दर ठरला होता. मात्र गुरुवारी सर्वसामान्यांना महागाईवरुन

महाविकास आघाडी आहे… एकमेकांचा सन्मान राखा…
राष्ट्रीय तपास यंत्रणाचे देशभर छापे
आरबीआयकडून रेपो रेटच्या दरात वाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यापासून किरकोळ महागाईचा दर हा 8 वर्षातील सर्वोच्च दर ठरला होता. मात्र गुरुवारी सर्वसामान्यांना महागाईवरुन दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या खाली दिसला आहे. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा महागाई 6 टक्क्यांच्या खाली गेली आहे आणि नोव्हेंबरच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाई दर 5.72 टक्के दिसला आहे, तर नोव्हेंबर महिन्यात हा आकडा 5.88 टक्के होता. आता देशातील किरकोळ महागाई वर्षभरातील नीचांकी पातळीवर आला आहे.
विशेषत: भाज्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात मोठे यश आले आहे. महागाईच्या बकेटच्या जवळपास 40 टक्के वाटा असलेला अन्नधान्य महागाई डिसेंबरमध्ये 4.19 टक्क्यांवर आली, जी मागील महिन्यात 4.67 टक्क्यांवर होती. दुसरीकडे, सरकारी आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादन निर्देशांक नोव्हेंबरमध्ये 7.1 टक्क्यांनी वाढला आहे, जो ऑक्टोबरमध्ये 4 टक्क्यांवर होता. फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना आता पुढील वर्षी 5 टक्के महागाईची अपेक्षा आहे. सुमारे 18 महिन्यांतील ही सर्वात कमी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये, ग्राहकांना महागाई सरासरी 2.4 टक्के अपेक्षित आहे, जे फेडच्या 2 टक्के उद्दिष्टापेक्षा अगदीच जास्त आहे.

COMMENTS