Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘चर्चेतील चेहरा’ कार्यक्रमात आदर्श सरपंच मयुर आंधळे यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित; प्रसिद्ध रामा इंटरनॅशनल हॉटेल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात झाला गौरव

वडवणी : समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व गाव विकासामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या चर्चेतील चेहर्‍यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्याचे ठ

महावितरणचा ‘उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार’ शेख अखिल उस्मान यांनाकर्तव्यनिष्ठ सेवेमुळे लातूर परिमंडळाकडून गौरव; माजलगांवात आनंदाचे वातावरण
‘जीपॅट’ स्पर्धेत संजीवनी बी. फार्मसीचे यश 
अकोलेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; समता परिषद व ओबीसी संघटनेकडून आयोजन
📍हॉटेल रामा इंटरनेशनल, छत्रपती संभाजीनगर मा. ना. श्री. प्रतापराव जाधव  साहेब (केंद्रीय आयुष मंत्री - भारत सरकार) यांच्या हस्ते दिव्य मराठी ...

वडवणी : समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व गाव विकासामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या चर्चेतील चेहर्‍यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्याचे ठरविले.त्यामध्ये वडवणी तालुक्यातील रुई गावचे आदर्श व युवा सरपंच मयूर आंधळे यांचीही निवड करण्यात आली होती.केंद्रीय मंत्री व विधान परिषदेचे सभापती यांच्या हस्ते मयुर आंधळे यांचा कुटुंबीयांसह गौरव करण्यात आला.
यावेळी दिव्य मराठीचे संपादक,प्रणव गोळवळकर,सीईओ नितिश जैन,जाहिरात विभागाचे प्रमुख सुभाष बोंद्रे,जाहिरात विभागाचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देवकते, वडील माजी सरपंच श्री. शंकरराव आंधळे, आई सौ. छायाताई आंधळे, मोठे बंधू भाजपा युवा मोर्चा बीड अध्यक्ष श्री. संजय आंधळे, नगरसेवक श्री. अमोल आंधळे, पत्रकार जानकिराम उजगरे, श्री. शुभम जायभाये, कृष्णा आंधळे व इतर ग्रा प सदस्य यांच्यासह संपुर्ण टिम व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध असलेल्या फाईव्ह स्टार रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये झालेल्या दिमाखदार सन्मान सोहळ्यामध्ये.वडवणी तालुक्यातील रुई गावचे आदर्श व युवा सरपंच मयूर आंधळे यांचा चर्चेतील चेहरा या सनमानसोळ्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्यांनी रुई गावामध्ये केलेल्या स्वच्छता,पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक, वयोवृद्धांना मदत, रक्तदान, गुणवंतांचा सत्कार,रस्ते, अंडरग्राऊंड नाली,पथदिवे,मंदीर,सभाग्रह,गावच्या जत्रामधुन सामाजिक संदेश,कुस्त्यांची दंगल 100 विकास कामापैकी केलेले 58 काम तर 50 सामाजिक उपक्रमापैकी 38 केले कामे  आशा आभुतपूर्व कामाची दखल दैनिक दिव्य मराठीने घेऊन ती समाजासमोर मांडली. याची दखल थेट केंद्रीय मंत्री व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतली आणि दैनिक दिव्य मराठीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात यांचा गौरव केला.बोलताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की,समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अ वर्णनीय काम करणार्‍या चर्चेतील चेहर्‍याची निवड दैनिक दिव्य मराठी ने केली ती अत्यंत योग्य व न्याय आहे.प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपल्या कामावर प्रेम केल्यानंतर त्या कामाची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक दिव्य मराठीचे जाहिरात विभागाचे सॅटॅलाइट हेड सुभाष बोंद्रे यांनी केले.
करत असलेल्या कामावर प्रेम केल्यावर कौतुक होते
कोणत्याही क्षेत्रात आपण स्वतः जे काम करतो ते काम मनातून केले.आणि त्या कामावर प्रेम केले तर त्या कामाची दखल घेतल्या जाते. तसेच कोणतेही काम साधे किंवा कमी नसते. त्या कामाला उच्च दर्जा देणारा माणूस जर योग्य असेल तर तो माणूस उंच शिखरावर जाऊन पोहोचतो. असे मत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले.

COMMENTS