Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तटकरेंसारखा नटसम्राट पाहिला नाही

आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे अधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे. या शिबीरामध्ये बोलतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आ

जितेंद्र आव्हाडांनी खरंच महिलेला धक्का दिला का? त्यावेळी नेमकं काय घडलं?
जितेंद्र आव्हाड यांची जामीन मंजूर झाल्यानंतर मुंब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष
आव्हाडांना अटक करणार्‍या उपायुक्तांची बदली

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे अधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे. या शिबीरामध्ये बोलतांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली. अजित पवार पक्षातून पुन्हा फुटतील असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वाटत नव्हते, तर पक्षातील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, असे शरद पवार यांना वाटत होते. तसे शरद पवार यांनी मला बोलूनही दाखवले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीच केला आहे. यासोबतच तटकरेंसारखा नटसम्राट आपण पाहिला नसल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे.
आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, सुनील तटकरे हे इमान राखून नाहीत हे शरद पवार यांना माहीत होते. त्यामुळे शरद पवार यांनी मला सांगितले होत की, सुनील तटकरे हे पुढील 5 वर्षात पक्षात टिकणार नाही, असा गौप्यस्फोट आव्हाड यांनी केला आहे. सुनील तटकरे हे दिवस रात्र शरद पवार यांच्याकडे येऊन एकच बोलायचे, चला ना भाजपसोबत जाऊ या. 2019 ला अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला. सुनील तटकरे तेव्हा शरद पवार यांच्या घरी सकाळी 8 वाजता आले. तुम्हाला वाटते का सुनील तटकरे यांना काही माहीत नाही? सुनील तटकरे यांच्यासारखा नटसम्राट मी पाहिला नाही. तर तुम्ही काय अजित पवार यांना राम मंदिरात जाऊन दर्शन देणार आहेत का? ज्या शरद पवारांच्या घरात राहून तुम्ही राजकरण केले आणि त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात? त्यामुळे तुम्हाला रामाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक आहे. अजित पवार यांनी आघाडीच्या सरकारमध्ये असताना बावनकुळे यांना किती मदत केली याची माहिती काढा. अजित पवार यांची वर्किंग स्टाईल वेगळी आहे. त्यांचा पॉलिसी मेकिंगचा एक तरी निर्णय मला त्यांनी सांगवा. शरद पवार यांचे पॉलिसीवर 100 निर्णय घेतले आहेत. अधिकार्‍यांना लवकर उठवून काही काम होत नाही. अजित पवार यांना झोप लागत नाही त्यामुळे ते सकाळी 6 वाजता उठून काम करतात आणि त्यांचे अस वागणे अधिकार्‍यांना सुद्धा आवडत नसल्याची टीका देखील आव्हाड यांनी केली आहे.

अधिवेशनाला आमदार रोहित पवारांची अनुपस्थिती – शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीश शिबीर सुरू असतांना या शिबिराकडे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दांडी मारली आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत असले तरी, रोहित पवारांनी एक्सवर आपण परदेशात असल्याचे म्हटले आहे. पवार म्हणाले, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्याने शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही आणि याबाबत पक्ष श्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये. आम्ही सर्वजण सोबत असून आदरणीय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू.

COMMENTS