Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळनेर येथील जि.प. शाळेच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ;आ. विजयसिंह पंडितांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी 77 लाखांचा निधी मंजूर करुन आणला

गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या वर्ग खोल्यांच्

शिक्षक-विद्यार्थी हितासाठी गतिमान प्रशासनाचा संकल्प : उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदेमा.आ.अमरसिंह पंडित यांनी केला उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांचा सत्कार
शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!
जि.प. शिक्षक विकास घोडके सर यांना ’प्रेरणास्तंभ’ पुरस्कार प्रदान; अमरसिंह पंडित यांच्या हस्ते गौरव

गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या वर्ग खोल्यांच्या इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. शाळेच्या सात वर्ग खोल्याच्या इमारत बांधकामासाठी 77 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे पिंपळनेर (ता. बीड) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेच्या सात वर्गखोल्यांच्या नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ ग्रामस्थ, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कामासाठी सुमारे 77 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पिंपळनेर येथील शाळेला स्वतःची इमारत नव्हती. तसेच अस्तित्वातील इमारत धोकादायक झाल्याने नवीन इमारतीची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विजयसिंह पंडित यांनी हा प्रश्न निकाली काढत निधी मंजूर केला. या कामासाठी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय नरवडे पाटील, शेख अमर, साप्ताहिक बीड प्रहारचे संपादक तथा शालेय समितीचे अध्यक्ष अशोक होळकर, सामाजिक कार्यकर्ते गोरख कांडेकर, माजी पंचायत समिती सदस्य किशोर सुरवसे, गंगा नरवडे, समाधान सिरसट यांच्यासह ग्रामस्थ व पालकांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, शाळेच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागल्याने पिंपळनेर व परिसरातील ग्रामस्थ, पालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले. यापूर्वीही पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिल्याची आठवण यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

COMMENTS