Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी खोटी

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत सामाजिक माध्यमांवर मोठ

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर खलबते ?
अजितदादांच्या फोटोपुढील ताटात टाचण्या टोचलेले लिंबू; अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फोटो केले शेअर
मुख्यमंत्री ग्रह सचिवांना बदनाम करणारा तथाकथित पत्रकार
Meera Borwankar Secret Explosion Neelam Gorhe Milind Narvekar

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरली होती. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने अधिकृतपणे अशी कोणतीही नियुक्ती झालेली नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
या अफवेच्या मागील पार्श्‍वभूमी पाहता, पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. याच दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत सरकारवर टीका केली होती. रोहित पवार यांनी हे पद रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या ठिकाणी राजकीय व्यक्तीऐवजी अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी भूमिका मांडली होती. त्यांनी मीरा बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांसारख्या अधिकार्‍यांची नावे सुचवली होती. मात्र त्यांच्या या सूचनेचा चुकीचा अर्थ काढत काही ठिकाणी बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची अप्रमाणित माहिती प्रसारित झाली आणि ती वेगाने पसरली.

COMMENTS