Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वनिर्मित पाऊलवाट नशीब बदलवते ःसुप्रिया कर्णिक

कोपरगाव प्रतिनीधी : बालपणात आई वडिलांनी आपल्या पाल्याला निर्माण करून दिलेल्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण केल्यास एक दिवस नक्कीच पाल्याने निश्‍चित केल

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
खुन करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस कोपरगाव पोलीसांकडुन अटक
LOK News 24 Iराहुरीतील फॅशन शु पॅलेस दुकान ७ दिवस सील

कोपरगाव प्रतिनीधी : बालपणात आई वडिलांनी आपल्या पाल्याला निर्माण करून दिलेल्या पाऊल वाटेवर मार्गक्रमण केल्यास एक दिवस नक्कीच पाल्याने निश्‍चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहचता येते असे मत हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रात नावाजलेल्या जेष्ठ सिनेअभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांनी येथील संकल्पना फाउंडेशन च्या दहा दिवसीय बाल नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी व्यक्त करत नाट्य व चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण करून करीयर करणे सोपे नसले तरी सुद्धा जिद्द,चिकाटी,सातत्य यांच्या जोरावर तुम्ही स्थान निर्माण करू शकतात, पालकांनी बालपणात आपल्या पाल्यावर एखादी गोष्ट जबरदस्तीने न लादता त्यांना स्वच्छंद पणे आपली वाट निवडू द्या असे कर्णिक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

प्रमुख उपस्थितीत असलेल्या, सिनेअभिनेत्री मयुरी देशमुख यांनी बोलताना सांगितले की, चित्रपट व मालिकांमध्ये आपली कला सादर करण्यासाठी ग्रामीण भागात बाल रंगभूमीचे व्यासपीठ निर्माण करणेकामी विद्यार्थी,पालक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायर्रत असणार्‍या संस्थांनी संयुक्त उपक्रम राबविणे गरजेचे आहे, आणि ते कार्य संकल्पना फाउंडेशन ही संस्था यशस्वीपणे करीत आहे असे गौरवोदगार  सिनेअभिनेत्री देशमुख  यांनी काढत शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ सिनेअभिनेत्री सुप्रिया कर्णिक, सिनेअभिनेत्री मयुरी देशमुख यांच्या सह माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सुधीर डागा, चित्रपट निर्माते भरत मोरे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, डॉ. योगेश लाडे, डॉ. शंतनु सरवार,डॉ.संजय उंबरकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत,सनदी लेखापाल अंकुश जोशी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात बालनाट्य,मूकनाट्य,शास्त्रीय नृत्य सादरीकरण करून शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉ. मयूर तिरमखे,डॉ.आस्था तिरमखे, प्रा.डॉ.किरण लद्दे,चेतन गवळी,प्रथमेश पिंगळे, रोहित शिंदे, गायत्री कुलकर्णी, प्रसाद सोनवणे,सुमित खरात, नरेंद्र मगर,साईश कुलकर्णी, प्रमोद सानप, कैलास नाईक, स्नेहल लद्दे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मयूर तिरमखे यांनी, आभार प्रदर्शन सचिव गणेश सपकाळ तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.शैलेंद्र बनसोडे  यांनी केले.

COMMENTS