श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आद्य क्रांतिकारी कवी व संतश्रेष्ठ कबीरदास यांची जयंती उत्साहपूर्ण वाताव

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आद्य क्रांतिकारी कवी व संतश्रेष्ठ कबीरदास यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे होते.
यावेळी उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, प्रा. अरुण जाधव, प्रा. उषा बोरुडे, प्रा. बांद्रे, प्रा. मोरे, प्रा. उगले, प्रा. मोरे मॅडम तसेच श्रीमती गायकवाड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. देवेंद्र बहिरम यांनी “भारतीय सामाजिक रूढी-परंपरा आणि संत कबीर यांचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले. संत कबीरांनी अंधश्रद्धा, जातिभेद व सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या विचारांतून आवाज उठवला असून त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रासंगिक आणि मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. कानडे राजाराम, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. राहुल गायकवाड तसेच प्रा. बी. टी. मांडे यांनी संत कबीरांच्या साहित्याचा आणि सामाजिक विचारांचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले.
उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात यांनी संत साहित्याचे महत्त्व विशद करताना, संत कबीरांचे विचार नित्य स्मरणात ठेवल्यास मनाची पवित्रता जपली जाते आणि समाजात समता, बंधुता व मानवतेची भावना दृढ होते, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय फटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजकांनी केले, तर प्रा. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

COMMENTS