अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Homeताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

अहमदनगर/प्रतिनिधी : शाळेत गेलेल्या अल्पवयीन (वय 14) मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना भिंगार शहरात घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प

आ.सत्यजित तांबे यांचा फ्लेक्स मधून होणारे विद्रूपिकरण थांबवण्यासाठी पुढाकार ; स्वतःचे फ्लेक्स काढले
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम
डॉ. मनुरकरांना बीजिंग विद्यापीठाची ‘विद्यावाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी; शेवगावच्या ग्रामीण युवकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी

अहमदनगर/प्रतिनिधी : शाळेत गेलेल्या अल्पवयीन (वय 14) मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना भिंगार शहरात घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेच्यादरम्यान घडली आहे.
फिर्यादी यांची मुलगी 17 जून रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. ती सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घरी न आल्याने फिर्यादी यांनी तिचा शोध घेतला. ती मिळून न आल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलीला पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डी. व्हि. झरेकर करीत आहेत.

COMMENTS