Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात राबवली स्वच्छता मोहीम

पाथर्डी/प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वच्छता पंधरवडा देशभर राबविण्यात येत आहे.त्या पा

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या तब्बल 109 विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

पाथर्डी/प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वच्छता पंधरवडा देशभर राबविण्यात येत आहे.त्या पार्श्‍वभूमीवर ’स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे एनसीसी छात्र व एनएसएस स्वयंसेवकांकडून संपूर्ण महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी सहभागी झालेल्या सर्व एनसीसी छात्रांना व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना स्वच्छतेची शपथ दिली. संपूर्ण वर्षभरात किमान 100 तास म्हणजेच आठवड्यात 2 तास श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता ठेवण्याची यावेळी सर्वांनी शपथ घेतली. आजच्या स्वच्छता अभियानात महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर, क्रीडांगण, वाहनतळ आदी परिसर श्रमदानाने स्वच्छ करण्यात आला. या परिसरात असणार्‍या काटेरी झुडपे, गवत, प्लास्टिक, कचरा जमा करून त्याचे कायमस्वरूपी निर्मुलन करण्यात आले तसेच जागोजागी असलेले मातीचे ढीग सपाट करण्यात आले तसेच तेथील अनावश्यक घनकचरा काढून टाकल्यामुळे महाविद्यालय परिसर प्रशस्त व स्वच्छ दिसू लागला. एन.सी.सी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे व एनएसएस विभागप्रमुख डॉ. अरुण राख यांच्या मार्गदर्शनाखाली 100 हून अधिक एनसीसी छात्र, एनएसएस स्वयंसेवक यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. याप्रसंगी ग्रंथपाल डॉ किरण गुलदगड व प्रा. आनंद घोंगडे उपस्थित होते.

COMMENTS