Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सर्वसामान्यांची फसवणूक-मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक पथदर्शक : अण्णा हजारे

पारनेर :  डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास जसा सोयीस्कर ठरत आहे, तसाच तो आर्थिक फसवणुकीचे नवनवीन धोकेही निर्माण करत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या काळात नागरिकांना जागरूक आणि सक्षम करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे यांनी लिहिलेले ‘सर्वसामान्यांची फसवणूक – मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक एक महत्त्वाचे कवच ठरेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केली. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २३) राळेगण सिद्धी येथे पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त असल्याचे नमूद केले. गेल्या ३५ वर्षांपासून ग्राहक संघटनांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीविरोधात काम करणाऱ्या विलास जगदाळे यांनी आपल्या अनुभवातून हे पुस्तक साकारले आहे. नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावेत, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांची गय नाही; पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी; जामखेड पोलिसांची मुख्य रस्त्यावर विशेष मोहीम
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! कल्याण-अहिल्यानगर हायवेवर व्हॅनचा चक्काचूर; ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू
के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

पारनेर :  डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा विकास जसा सोयीस्कर ठरत आहे, तसाच तो आर्थिक फसवणुकीचे नवनवीन धोकेही निर्माण करत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या काळात नागरिकांना जागरूक आणि सक्षम करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे यांनी लिहिलेले ‘सर्वसामान्यांची फसवणूक – मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक एक महत्त्वाचे कवच ठरेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केली.

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २३) राळेगण सिद्धी येथे पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त असल्याचे नमूद केले.

गेल्या ३५ वर्षांपासून ग्राहक संघटनांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीविरोधात काम करणाऱ्या विलास जगदाळे यांनी आपल्या अनुभवातून हे पुस्तक साकारले आहे. नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हावेत, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.

COMMENTS