Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टरकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

बदलापूर : बदलापुरात एका डॉक्टरने 23 वर्षीय गतीमंद मुलीवर आपल्याच दवाखान्यात बोलवून लैगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकर

बीड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणात मुख्य न्यायाधीश हेमंत महाजन यांना निवेदन-डॉ.गणेश ढवळे
नागवडे कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी विजय मुथा व रमजान हवालदार यांची निवड
सर्वोच्च न्यायालयाचे दोन दिवस वर्क फ्रॉम होमन्यायालयीन कर्मचार्‍यांना दोन दिवस घरून कामाची मुभा

बदलापूर : बदलापुरात एका डॉक्टरने 23 वर्षीय गतीमंद मुलीवर आपल्याच दवाखान्यात बोलवून लैगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बदलापूर पश्‍चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर हेमंत सोनवणे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमेही लावण्यात आली आहेत. बदलापूर पश्‍चिमेतील मांजर्ली परिसरात दिपाली पार्क समोरील साईकृपा सोसायटीमध्ये डॉ. हेमंत सोनवणे याचा दवाखाना आहे. रविवारी दुपारी गतिमंद मुलगी सोनवणे याच्या दवाखान्यासमोरून किराणा दुकानात जात असताना डॉक्टरने तरुणी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला आपल्या दवाखान्यात बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बराचवेळ तरुणी घरी परतल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता डॉक्टर सोनवणे याच्या दवाखान्याबाहेर त्या तरुणीची चप्पल आढळली. कुटुंबाने दवाखान्यात प्रवेश केला असता डॉक्टर त्या गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार करताना आढळून आला. सोनवणे याच्या विरोधात बदलापूर पश्‍चिम पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

COMMENTS