Homeताज्या बातम्या

स्व. अजित पवार व घुले पाटलांचे जिव्हाळ्याचे नाते होते : पाऊलबुद्धे

शहरटाकळी: स्वर्गीय अजित पवार व घुले पाटील कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अजित दादांनी माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील तसेच माजी आमदार चंद्र

फरार आरोपी २२ वर्षांनंतर जेरबंद; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई, नाव बदलून पोलिसांना देत होता चकवा
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शहरटाकळी: स्वर्गीय अजित पवार व घुले पाटील कुटुंब यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. अजित दादांनी माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आमदार असताना तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला, असे प्रतिपादन दहिगावने चे माजी सरपंच सूर्यकांत पाऊलबुद्धे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील दहिगावणे येथील नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व. अजित पवार यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी पाऊलबुद्धे बोलत होते.

यावेळी प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रमेश खैरे यांनी अजित दादांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याचा उल्लेख आपल्या मनोगतातून व्यक्त केला. या प्रसंगी शिक्षक बापूसाहेब लोढे, दहिगावने चे माजी सरपंच डॉ. अरुण पवार व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य जयराम नांगरे, पर्यवेक्षक मच्छिंद्र पानकर, माजी सरपंच सुभाष पवार, जयराम निळ, विकास कसबे आदी मान्यवर तसेच विद्यालयीन शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मकरंद बारगुजे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाबासाहेब मोहिते यांनी मानले.

COMMENTS