चौसाळा : चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा अभियान 2026’ अंतर्गत 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोज

चौसाळा : चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा अभियान 2026’ अंतर्गत 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा संदेश दिला. पी.जी. डायरेक्टर वनवे सर, उपप्राचार्य ढवळशंक आणि डॉ. विलास भिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी प्रा. संजय घाडगे, प्रा. बाळासाहेब कोल्हे, प्रा. सुधीर तेलप, प्रा. मनीषा गिराम, प्रा. भागवत कुरुंद, डॉ. अमर अलदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.

COMMENTS