बीड : बीड जिल्ह्यातील इमामपूर गावासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणार्या इमामपूर ग्रा

बीड : बीड जिल्ह्यातील इमामपूर गावासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणार्या इमामपूर ग्रामस्थांना आता कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे इमामपूर ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या पाणीप्रश्नाला आता कायमचा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या दौर्यात इमामपूर परिसरात चठॠड अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणीही करण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, इमामपूर येथे सुमारे 1 हजार झाडांची लागवड करण्यात आली असून, या झाडांचे संगोपनही केले जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाचीदेखील मंत्री भरतशेठ गोगावले पाहणी करणार आहेत. पाणी, रोजगार आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांमध्ये इमामपूरच्या विकासाला चालना देणारा हा उपक्रम ठरणार असून, 13 ऑगस्टचा दिवस इमामपूरच्या इतिहासात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

COMMENTS