Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’मविआ’ कोणतीही फूट पडणार नाही ः खा.डॉ. अमोल कोल्हे

पुणे ः महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी महाविकास आघाडी भक्कम असून त्यात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा शरद पवार गट

संसदरत्न खा.अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ॲड.प्रतापराव ढाकणे सुरु केलेल्या युवा संवाद अभियानाचा सोमवारी युवा संवाद अभियानाचा समारोप
शिरुरमधून डॉ. कोल्हेच लढणार लोकसभा
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडताना अमोल कोल्हेंचं सूचक भाष्य

पुणे ः महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी महाविकास आघाडी भक्कम असून त्यात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. तसेच शेतकर्‍यांच्या ताटात माती कालवण्याचे काम या राक्षसी वृत्ती असलेल्या भाजपच्या सरकारने केले आहे, असा हल्लाबोल ही त्यांनी केला. ते हडपसर येथे ’मविआ’च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे. राम मंदिराची उभारणी केली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण आम्ही एक दिवस रामाच्या दर्शनासाठी जातो. पण उरलेल्या 364 दिवस आम्हाला महागाई, बेरोजगारी, अंदाधुंदी, सांप्रदायिक वातावरणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करून निवडणुकांध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, येणारी निवडणूक ही काय फक्त शरदचंद्र पवार साहेबांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभीमानाची लढाई असणार आहे. येणार्‍या काळात प्रत्येकाला मानाचे पान मिळेल. पण त्यासाठी आधी लग्न कोंढाण्याचे त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत तुम्ही सर्व लोक ताकदीने काम कराल, अशी अपेक्षा व खाशी देखील आहे. महाविकास आघाडीवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, मी मोठ्या विश्‍वासाने सांगतो की, महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही, याची खात्री मला आहे. आपण सर्वच लोक सामान्य कुटुंबातील लोक आहोत. माझ्यासारख्या शेतकर्‍यांच्या मुलाला शरद पवार साहेबांनी संधी दिली. तशीच संधी प्रत्येकाला मिळेल. प्रामाणिकपणे काम करा, हडपसर मतदार संघात विजय आपलाच होईल, असा विश्‍वास देखील कोल्हे यांनी व्यक्त केला.  

COMMENTS