Homeताज्या बातम्या

बेशिस्त व उद्धट शिक्षकावर कारवाईची मागणी; शिक्षणाधिकार्‍यांच्या आदेशाला बीईओंकडून दुर्लक्ष: सीईओ जितीन रहमान यांनी शिस्त लावण्याची गरज

उमापूर : उमापूर येथील जि.प. उर्दू प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक जुल्हा अदनान यांच्यावर बेशिस्ती, नियमबाह्य गैरहजेरी आणि सहकार्‍यांसोबत उद

दमिरर..!
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
बीड जिल्हा परिषद सीईओ जितीन रहमान, त्यांचे ऊसतोड कामगारांना  आव्हान,निमंत्रण, काय आहे पहा

उमापूर : उमापूर येथील जि.प. उर्दू प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक जुल्हा अदनान यांच्यावर बेशिस्ती, नियमबाह्य गैरहजेरी आणि सहकार्‍यांसोबत उद्धट आणि गैरवर्तनाच्या तक्रारींवर कारवाई व्हावी, अशी मागणी शाळेतील शिक्षकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी केली आहे. मात्र यासंबधी शिक्षणाधिकार्‍यांनी 27 जुलै रोजी दिलेल्या चौकशीच्या स्पष्ट आदेशाकडे गटशिक्षणाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने आता अधिकार्‍यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही मागणी पालकांकडून होत आहे. शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुल्हा अदनान वारंवार विनापरवानगी गैरहजर राहत असत. हजर असलेल्या दिवशीही ते नियमबाह्य पद्धतीने मस्टरवर सही करीत. ‘मी मुख्याध्यापक आहे’ असे सांगत त्यांनी स्वतः कोणताही वर्ग घेतला नाही आणि कधीही अध्यापन केले नाही. इतर शिक्षकांसोबत गैरवर्तन, अपमानास्पद वागणूक आणि अर्वाच्य भाषा वापरल्यामुळे शाळेचे वातावरण बिघडले. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आणि शैक्षणिक नुकसान होत आहे , असे तक्रारीत म्हटले आहे. या बेशिस्त व उद्धट शिक्षकावर कारवाई व्हावी म्हणून शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी बीड जिल्हा परिषदेत तक्रार दाखल केली होती. या शिक्षकांवर यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या; परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांचे मनोबल वाढले असल्याचे दिसून येते, असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी गेवराईचे गटशिक्षणाधिकारी नांदुरकर यांना चौकशी करून सात दिवसांच्या आत अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्याचे 27 जुलै रोजी लेखी आदेश दिले होते. तरीही याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही किंवा चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी या शिक्षकांना पाठीशी घालत आहेत का, तसेच या पाठीमागे काय ’अर्थ’ आहे असा संशय पालकांमध्ये व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहमान यांनी याकडे लक्ष देऊन शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यानां प्रशासकीय शिस्त लावावी अशी मागणी आता जोरदारपणे केली जात आहे.

COMMENTS