Homeताज्या बातम्यादेश

नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीपेपरफुटीमुळे निर्णय ; देशातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट 2026 पदवीपूर्व परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रश्‍नपत्रिका परी

महाराष्ट्र उएढ 2026 : तंत्रज्ञानाचा नवा मापदंडपारदर्शकता, सुरक्षा आणि निष्पक्षतेला बळकटी; अत्याधुनिक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला प्रयोग थांबणार कधी?


नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट 2026 पदवीपूर्व परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रश्‍नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला. राष्ट्रीय चाचणी संस्थेने अधिकृत निवेदन जारी करत परीक्षेचे पुनर्नियोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून, नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा देशभरातून तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय चाचणी संस्थेने सांगितले की, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. तपासासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, नोंदी आणि तांत्रिक कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील, असेही संस्थेने स्पष्ट केले. परीक्षेची विश्‍वासार्हता टिकवून ठेवणे आणि विद्यार्थ्यांचा विश्‍वास अबाधित राखणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
विशेष कृती गटाने जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांतील शेकडो प्रश्‍न असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व प्रश्‍न हस्तलिखित स्वरूपात असून, त्यांचे हस्ताक्षर एकसारखे असल्याने तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला आहे. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या अंदाजपत्रिकेतील काही प्रश्‍न जुळणे सामान्य बाब असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्‍न जुळणे अत्यंत गंभीर मानले जाते. या प्रकरणात सामाजिक माध्यमांवरील संवाद, दूरध्वनी नोंदी आणि संदेशांची कसून तपासणी केली जात आहे. संशयितांनी कोणाशी संपर्क साधला, प्रश्‍नसंच कुठून आला आणि तो कोणकोणापर्यंत पोहोचला, याचा तपशील शोधण्याचे काम सुरू आहे. तपास यंत्रणा या प्रकरणामागील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.एका निवासव्यवस्था चालकाने परीक्षेनंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्यांना संशयास्पद प्रश्‍नसंच मिळाल्याची माहिती त्याने दिल्यानंतर तपास अधिक वेगाने पुढे गेला. तपासात असेही आढळून आले की, संबंधित व्यक्तीलाही सामाजिक माध्यमांवरून तो प्रश्‍नसंच प्राप्त झाला होता.
नाशिकमधून एकाला धेतले ताब्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात राजस्थानातून 13 जणांना ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिकमधून 30 वर्षींय शुभम खैरनारला ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शुभमवर गंभीर आरोप ठेवण्यात आले असतानाच, आता त्याचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी आपल्या मुलाची बाजू मांडली असून, तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर बोलताना शुभमचे वडील डॉ. मधुकर खैरनार म्हणाले की, आमचा मुलगा निर्दोष आहे.
परीक्षेच्या दोन दिवस आधीच मिळाले प्रश्‍न ?
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधीच अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रश्‍न पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका वैद्यकीय विद्यार्थ्याने मित्राला पाठवलेला कथित प्रश्‍नसंच पुढे विविध विद्यार्थ्यांमध्ये पसरल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. हा संच काही निवासव्यवस्था चालकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचेही समोर आले आहे.

COMMENTS