Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

नीट पेपरफुटी प्रकरणाने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार?

नांदेड: देशातील सर्वाधिक स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली असून, पेपरफ

अधिकारी यांच्या पीएच्या हत्यची सीबीआय चौकशी
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीपेपरफुटीमुळे निर्णय ; देशातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा


नांदेड: देशातील सर्वाधिक स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली असून, पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आले आहे. वर्षानुवर्षे दिवस-रात्र अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍यांनी आता कोणावर विश्‍वास ठेवायचा? असा संतप्त सवाल पालक आणि विद्यार्थ्यांतून उपस्थित होत आहे.
3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची प्रश्‍नपत्रिका दोन दिवस आधी म्हणजे 1 मे रोजी काही विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर हस्तलिखित स्वरूपात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे परीक्षेनंतर या प्रश्‍नपत्रिकेतील अनेक प्रश्‍न आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्‍न यामध्ये मोठे साधर्म्य आढळल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. मात्र, ही प्रश्‍नपत्रिका नेमकी कुठून आणि कशी बाहेर आली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एका पालकाने पोलिसांकडे गोपनीय तक्रार केली होती. त्यांच्या मुलाकडे परीक्षेच्या दोन दिवस आधी काही प्रश्‍न आले होते. परीक्षा झाल्यानंतर तेच प्रश्‍न प्रत्यक्ष पेपरमध्ये असल्याचे दिसून आले. यानंतर लातूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यात धक्कादायक माहिती समोर येऊ लागली.
या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत सेवानिवृत्त प्राध्यापक आणि नीट परीक्षेचे पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईहून आलेल्या सीबीआयच्या पथकाने मध्यरात्री त्यांच्या घरावर धाड टाकून तब्बल 12 तास चौकशी केली. घरातून लॅपटॉप, कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीनंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आले. प्रा. कुलकर्णी हे केमिस्ट्री विषयाचे तज्ज्ञ असून, फुटलेल्या प्रश्‍नपत्रिकेतील बहुतांश प्रश्‍न केमिस्ट्री विषयाशी संबंधित असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. ते मागील चार वर्षांपासून नीटच्या पेपर सेटिंग प्रक्रियेशी संबंधित समितीवर कार्यरत होते. तसेच पुण्यातील ऊएएझएठ संस्थेसोबत ते मागील 11 वर्षांपासून जोडले गेले होते. ही संस्था नीट, जेईई आणि एमएचटी-सीईटीसाठी सराव परीक्षा आणि प्रश्‍नसंच तयार करण्याचे काम करते.
या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असली तरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थता वाढतच आहे. अनेक विद्यार्थी दोन-दोन वर्षे ड्रॉप घेऊन नीटची तयारी करतात. लाखो रुपये कोचिंग क्लासेसवर खर्च केले जातात. पालक स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी झटत असतात. मात्र अशा पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीची किंमतच शून्य ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सततची स्पर्धा, अभ्यासाचा ताण, अपयशाची भीती आणि त्यात पेपरफुटीच्या बातम्या यामुळे अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. रात्रंदिवस अभ्यास करूनही जर काही जण पैशांच्या जोरावर किंवा गैरमार्गाने पुढे जाणार असतील, तर आमच्या मेहनतीचे काय? असा प्रश्‍न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

COMMENTS