Homeताज्या बातम्या

विशेष सखोल पुनर्निरक्षण मोहिमेत नांदेड दक्षिणची 99 टक्के प्रगती

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी अंतिम टप्प्यात; उर्वरित 1,847 मतदारांचे काम तीन दिवसांत पूर्ण होणार नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला टॅक्सी जीपची जोरदार धडक, ८ जण जखमी
अहिल्यानगरमध्ये खासगी शाळेच्या प्राचार्यांचे अमानुष कृत्य; तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबून हवेत टांगले! गुन्हा दाखल
कोयना धरणाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नामकरण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी अंतिम टप्प्यात; उर्वरित 1,847 मतदारांचे काम तीन दिवसांत पूर्ण होणार

नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनर्निरक्षण मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आजअखेर 99 टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ 1,847 मतदारांची नोंदणी प्रक्रिया शिल्लक असून येत्या तीन दिवसांत शंभर टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 3) उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि बीएलए-1 यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत गणना पत्रांचे वाटप, बीएलओंकडे प्राप्त झालेल्या व संगणकीकरण झालेल्या अर्जांचा आढावा, मयत, स्थलांतरित, गैरहजर, दुबार अथवा संपर्क न झालेल्या मतदारांची माहिती तसेच प्रस्तावित नवीन मतदान केंद्रांची मतदान केंद्रनिहाय यादी पीडीएफ स्वरूपात संबंधितांना उपलब्ध करून देण्यात आली. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व 312 मतदान केंद्रांमध्ये गणना पत्रांचे शंभर टक्के वाटप पूर्ण झाले आहे. प्राप्त अर्जांपैकी 78 टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून एकूण प्रक्रियेत 99 टक्के प्रगती साधण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यावेळी डॉ. खल्लाळ यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आवाहन करताना सांगितले की, संपर्क न झालेल्या अथवा ’अनकलेक्टेबल’ म्हणून नोंद झालेल्या मतदारांचे गणना पत्र संबंधित बीएलओंकडे जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. विहित मुदतीत गणना पत्र सादर न करणार्‍या किंवा संपर्क न झालेल्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणार्‍या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार नाहीत. अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष सखोल पुनर्निरक्षण मोहिमेतील हे आव्हानात्मक काम बीएलओ, पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे बीएलए आणि प्रतिनिधी यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पूर्णत्वाकडे जात असल्याचे सांगून डॉ. खल्लाळ यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS