Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंधला नळपाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी निधी मंजूर ; श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती

औंध / वार्ताहर : औंध गावच्या जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना य

म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ठिय्या
दहिवडीत चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई
नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड

औंध / वार्ताहर : औंध गावच्या जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून औंधला जलजीवन मिशन कार्यकर्मांतर्गत पिण्याचे पाणी मिळणार आहे. या योजनेसाठी लागणार्‍या 16 कोटी 27 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी राजकन्या चारुशिलाराजे यांना साकडे घातले होते. चारुशीलाराजे यांनी हा जिव्हाळ्याचा विषय आई गायत्रीदेवी यांच्याकडे मांडून मार्ग काढण्याची विनंती केली होती. गायत्रीदेवी यांनी लेकीचे गार्‍हाणे ऐकून गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मागील काही दिवसांपासून शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. अगोदर औंधसह 16 गावांच्या शेती पाणी योजनेचा प्रश्‍न मार्गी लावून गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सोळा गावातील शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. आता औंधच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात काढल्याने औंधमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील सुमारे पंधरा वर्षापूर्वी पासून औंधसह 21 गावासाठी असणारी येरळवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा बंद पडल्याने औंधवासियांना अनेक अडचडणींना सामोरे जावे लागले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंधचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवले होते. जलजीवन मिशन कार्यक्रम योजनेतंर्गत शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुर्ण करण्यात येणार आहे. या योजनेची कायमस्वरूपी अंमलबजावणी ग्रामपंचायतीमार्फत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या योजनेतंर्गत प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. ही नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याने औंधकर वासियांना दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, राजकन्या चारुशिलाराजे यांचे औंध ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS