Homeताज्या बातम्या

नांदेड शहरातील बाफनाबाफना पुलाखाली दिवसाढवळ्या खंजीराचा धाक दाखवत युवकाला लुटले; परिसरात गुन्हेगारांचा वाढता वावर चिंतेचा विषय

नांदेड: शहरातील बाफना पुलाखाली दिवसाढवळ्या खंजीराचा धाक दाखवत अर्धापूर येथील एका युवकाला चार अज्ञात लुटारूंनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली. तोंड

आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
आष्टी पोलिसांची धडक कारवाई; २४३ गुन्ह्यांतील ७.८४ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट!
वाईत 'हनी ट्रॅप' रॅकेटचा पर्दाफाश; बदनामीची धमकी देऊन तरुणाकडून लुटले पावणेतीन लाख | Navarashtra

नांदेड: शहरातील बाफना पुलाखाली दिवसाढवळ्या खंजीराचा धाक दाखवत अर्धापूर येथील एका युवकाला चार अज्ञात लुटारूंनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या चौघांनी युवकाच्या खांद्यावरील बॅग हिसकावून घेतली, तसेच त्याच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मोबाईल फोनही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र युवकाने धाडस दाखवत मोबाईल देण्यास नकार दिल्याने लुटारूंना तो घेता आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर येथील संबंधित युवक काही कामानिमित्त नांदेड शहरात आला होता. बाफना पुलाखालून जात असताना अचानक चार युवकांनी त्याला घेरले. सर्वांच्या चेहर्‍यावर रुमाल बांधलेले होते. त्यांनी खंजीराचा धाक दाखवत युवकाला धमकावले आणि त्याच्याकडील रोकड व बॅग हिसकावून घेतली. जीवाच्या भीतीने युवकाने खिशातील पाच हजार रुपये त्यांना दिले. त्यानंतर आरोपींनी मोबाईल घेण्याचाही प्रयत्न केला; मात्र युवकाने प्रतिकार केल्याने आरोपी तेथून पळ काढल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS