श्रीगोंदा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमहर्षी नागवडे साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले, लिंपणगावच्या सरपंच शोभा कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. दत्तात्रय गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कोकाटे, युवा उद्योजक सुरेश पवार, माजी प्राचार्य रंगनाथ राजापुरे, जिजाबाई कापरे तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची झलक पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी गणपती गीत, शेतकरी गीत, कोळीगीत, भक्तीगीत तसेच लावणीसारख्या विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मधुकर काळाणे, काकासाहेब दातीर यांच्यासह अनेक मान्यवर, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील पालक, नागरिक, ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मढेवडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भुकन तसेच तालुक्यातील इतर शिक्षकांनीही कार्यक्रमाला भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका पद्मा शिर्के, गायकवाड, जरांडे, खिळे, पाचांगणे आणि पऱ्हे यांनी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ अधिकारी आशुतोष पाचपुते यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नाना रसाळ व संदीप हिरवे यांनी केले. यावेळी ऍड. अशोकराव रोडे, सुनील जंगले, लहानु जंगले, संदीप जाधव, तसलीम शेख, दीपक दांडगे, अजय घोडके, आदिनाथ पाचपुते, शेलार,माता-भगिनी उपस्थित होत्या. लिंपणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख जामदार, काष्टी बीटचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे तसेच श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

श्रीगोंदा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन सहकारमहर्षी नागवडे साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव जंगले, लिंपणगावच्या सरपंच शोभा कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. दत्तात्रय गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कोकाटे, युवा उद्योजक सुरेश पवार, माजी प्राचार्य रंगनाथ राजापुरे, जिजाबाई कापरे तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची झलक पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी गणपती गीत, शेतकरी गीत, कोळीगीत, भक्तीगीत तसेच लावणीसारख्या विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मधुकर काळाणे, काकासाहेब दातीर यांच्यासह अनेक मान्यवर, श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील पालक, नागरिक, ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मढेवडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भुकन तसेच तालुक्यातील इतर शिक्षकांनीही कार्यक्रमाला भेट दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका पद्मा शिर्के, गायकवाड, जरांडे, खिळे, पाचांगणे आणि पऱ्हे यांनी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ अधिकारी आशुतोष पाचपुते यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नाना रसाळ व संदीप हिरवे यांनी केले. यावेळी ऍड. अशोकराव रोडे, सुनील जंगले, लहानु जंगले, संदीप जाधव, तसलीम शेख, दीपक दांडगे, अजय घोडके, आदिनाथ पाचपुते, शेलार,माता-भगिनी उपस्थित होत्या.
लिंपणगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख जामदार, काष्टी बीटचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे तसेच श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

COMMENTS