Homeताज्या बातम्या

सरसेनापती माणकोजी दहातोंडेंवर येणार पहिला पोवाडा; शिवशाहीर अक्षय डांगरे करणार सादरीकरण

शेवगाव : हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित पहिला ऐतिहासिक पोवाडा श्रीक्षेत्र वरूर (ता. शेवगाव) येथी

शेवगावमध्ये २९ मे पासून श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथा सोहळा
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनजागृती आंदोलन
पुरोहितांनी गावाला जेऊ घातला ‘धोंडा’; गुहा येथे धार्मिक एकात्मतेचा अनोखा संदेश
स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजीराव शिंदे दहातोंडे ▫माणकोजी दहातोंडे  सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा. ▫जन्म - (१५९२ - १५९५) ▫मुळगाव – चांदा ...

शेवगाव : हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्या जीवनकार्यावर आधारित पहिला ऐतिहासिक पोवाडा श्रीक्षेत्र वरूर (ता. शेवगाव) येथील प्रतिभासंपन्न युवा शिवशाहीर अक्षय डांगरे सादर करणार आहेत. शेवगाव येथे आयोजित ३६० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन चंद्रकांत महाराज लबडे यांनी केले होते. थोर इतिहास अभ्यासक व सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे वंशज संतोषकुमार दहातोंडे यांच्या हस्ते शिवअभिषेक करण्यात आला. याप्रसंगी संतोषकुमार दहातोंडे यांना त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल सन्मानितही करण्यात आले. याच कार्यक्रमात सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांच्यावरील पहिल्या पोवाड्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

हा पोवाडा सादर करणारे युवा शिवशाहीर अक्षय डांगरे हे आपल्या शाहिरीच्या माध्यमातून तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि शिवरायांचा इतिहास रुजवण्याचे काम करत आहेत. दिवंगत राष्ट्रीय शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना गुरुस्थानी मानणारे डांगरे यांनी भातकुडगाव येथील प्रसिद्ध शिवशाहीर व कीर्तनकार कल्याण काळे यांच्याकडे शाहिरी कलेचे रीतसर शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या नव्या ऐतिहासिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

COMMENTS