Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश शैक्षणिक संकुलात घेतले बाळुमामा रथाचे दर्शन

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलातील बाळुमामा यांच्या रथाचे दर्शन

पश्‍चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; 5 लाख 60 हजार ग्राहकांना पुनर्वीज जोडणी संधी
Shevgaon : केदारेश्वर कारखान्याची ३२ वी ऑनलाइन वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न (Video)
फेडरेशन सोसायटीच्या संचालकपदी राहुल महाडिक बिनविरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलातील बाळुमामा यांच्या रथाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, सांगली जिल्हा बॅकेचे संचालक संग्राम देशमुख, भाजपा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजपा ओबीसीचे अध्यक्ष मधुकर हुबाले, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, सतेज पाटील, प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत, पोपट पवार, अजित पाटील, अक्षय कोळेकर, भास्कर कदम, नितीन चौगुले, शरद अवसरे, शरद पाटील, नाथगौंडा पाटील, पोपट जगताप, प्रविण परीट यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोंगडं व काठी देऊन फडणवीस यांचा सन्मान
गेल्या दोन दिवसापासून बाळुमामा यांचा रथ प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात भाविकांच्या दर्शनासाठी होता. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळुमामा यांच्या रथाचे दर्शन घेतले. यावेळी धनगर समाजाच्या वतीने भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने, महादेव श्रीराम, दिनकर कोळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचा घोंगडं व काठी देऊन सन्मान केला.

COMMENTS