Homeताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या हत्याकांडाच्या घटना; राहुरीत कर्मचाऱ्याचा तर श्रीरामपूरमध्ये मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून

देवळाली प्रवरा/श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी घडलेल्या दोन स्वतंत्र हत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यात कापूस

शेवगाव दूध भेसळ प्रकरणातील तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल; अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या चौकशीचे निर्देश
मोहा हद्दीतील अवैध कलाकेंद्र बंद करा; अन्यथा अमरण उपोषण करणार: सचिन आजबे यांचा इशारा
पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक
maharashtra ahmednagar Crime News Police sub-inspector of Rahuri rapes  woman | Ahmednagar Crime : 'तू खूप छान दिसतेस, माझ्याशी मैत्री कर',  राहुरीच्या पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर ...

देवळाली प्रवरा/श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी घडलेल्या दोन स्वतंत्र हत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यात कापूस सुधार प्रकल्पातील कंत्राटी कामगाराचा अज्ञात हल्लेखोराने खून केल्याची घटना उघडकीस आली, तर श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे एका तरुणाने वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पहिली घटना : राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात खून राहुरी-शनिशिंगणापूर रोडलगत असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात काम करणाऱ्या २७ वर्षीय कंत्राटी कामगाराची अज्ञात हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २ जून) रात्री घडली. मृत युवकाचे नाव श्रीकांत पोपट दोंदे (वय २७, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) असे आहे. तो रात्री कार्यालयाच्या मागील बाजूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून राहुरी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दुसरी घटना : खंडाळा येथे मुलाकडून वडिलांची हत्या श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी पहाटे एका तरुणाने आपल्या वडिलांची धारदार हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. खंडाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ वास्तव्यास असलेले सचिन प्रभाकर ढोकचौळे (वय ५५) हे त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांचा मुलगा प्रणव सचिन ढोकचौळे (वय २५) याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर प्रणव याने टिकावाने वडिलांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. संशयित आरोपी हा मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS