Homeताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विखे पाटील सैनिक स्कूलचे २१ जलतरणपटू 

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, लोणी

माजी आमदार वैभव पिचड अधिकाऱ्यांवर संतापले.
प्रभाग रचना बदलल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढणार
“आता लॉकडाउन लावावाच लागेल” | Maharashtra Lockdown |

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, लोणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण चाचणी स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तब्बल २१ खेळाडूंनी गुणवत्तेच्या जोरावर निवड मिळवली. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ शाळांमधील सुमारे ३०० जलतरणपटूंनी सहभाग घेतला. विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या असून सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट जलतरण कौशल्याचे प्रदर्शन केले.स्पर्धेचे उद्घाटन सैनिक स्कूलचे कर्नल सुभाष घोडागेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्राचार्य राजेश माघाडे, जिल्हा सचिव बाबर तसेच अखिल शेख, सर्वेश देशमुख, प्रणित ठोकळे, माणिक गायकवाड, योगिता तनपुरे, सुचित्रा तांबे, अजित चेचरे व संदीप ईघे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन यशस्वीरित्या पार पडले.राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू असे अंश काळे, ओंकार क्षीरसागर, ध्रुव विश्वास, बिशाल भारती, सक्षम सुकाळे, ओम हातणकर, राजवर्धन पाटील, साईराज अदनाक, अर्णव पळशीकर, श्रेय गांधी, वेदांत रेपे, हर्ष गडगे, मिथिलेश रायकवाड, दर्शन अवचर, अर्नेश औटी, शौर्य गायकवाड, अथर्व शिंदे, मलोई सिंघानिया, गौरव चव्हाण, स्वराज नागडे, संस्कार भूमकर, मलय सिंघानिया, गौरव चव्हाण.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

COMMENTS