Homeताज्या बातम्या

श्री.गिरीश कुबेर यांचे व्याख्यान

प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या 94 व्या जयंतीचे औचित्य साधून रविवार,दि. 12 जुलै 2026 रोजी नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केन्द्राच्या वतीने ज्ये

पंढरपूर कॅरिडॉर-विकासाचा नवा मार्ग
हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर; बंपर उत्पादन होऊनही वांग्याला मिळाला अवघा १ रुपये भाव
रुपया विक्रमी नीचांकी पातळीवरपरकीय चलनाच्या तुलनेत 95.20 वर पोहोचला



प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या 94 व्या जयंतीचे औचित्य साधून रविवार,दि. 12 जुलै 2026 रोजी नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केन्द्राच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि दै.लोकसत्ताचे संपादक श्री.गिरीश कुबेर यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष व्याख्यानात ते ’महाराष्ट्राची वैचारिक परंपरा’ या विषयावर मांडणी करणार आहेत.   गिरीश कुबेर हे मराठीतील एक नामवंत आणि व्यासंगी पत्रकार,लेखक आणि संपादक म्हणून ज्ञात आहेत.  मराठी समाजातील सर्व स्तरांमध्ये दै. लोकसत्तातील त्यांचे अग्रलेख हे आवर्जून वाचले जातात आणि  लोकप्रिय आहेत.आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत.2010 पासून ते लोकसत्ताचे संपादक आहेत. त्याआधी ते इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी दैनिकात तसेच महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते.  त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले आहे.’अधर्मयुध्द’,’एका तेलियाने’,’टाटायन’,’युध्द जिवांचे’,’हा तेल नावाचा इतिहास आहे’, आणि ’पुतिन:महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान’ हे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ होत.  सायन्स कॉलेजच्या पूरणमल लाहोटी सभागृहात सायं.6 वाजता होणार्या या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केन्द्राचे अध्यक्ष प्रा.दत्ता भगत व संचालक डॉ.यशवंत जोशी यांनी केले आहे.

COMMENTS