Homeताज्या बातम्या

विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळला; 2 विद्यार्थिनी जखमी, निकृष्ट कामावर संताप

 नांदेड- लातूर राज्य महामार्ग क्रमांक- 161 वरील विष्णुपुरी परिसरात गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाजवळ उभारण्यात आलेल्य

एकाच दिवशी 2 दिग्गज कलाकारांचा अपघाती अंत निर्माते आर. बी. चौधरी आणि अभिनेते संतोष नायर यांचे निधन
प. बंगालमध्ये रिफायनरी प्रकल्पात स्फोट15 कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम
श्रीगोंद्यात जखमी हरिणाचा मदतीअभावी मृत्यू; नागरिकांचा वन विभागावर संताप



 नांदेड- लातूर राज्य महामार्ग क्रमांक- 161 वरील विष्णुपुरी परिसरात गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा खालचा दगडी भाग (परटेनिंग वॉल) अचानक कोसळल्याने दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूचा दगडी काँक्रीटचा भाग अचानक तुटून खाली पडला. के टी एल या कंपनीने या उड्डाणपुलाच्या काँक्रीट करण्याचे काम केले आहे. यावेळी त्या ठिकाणावरून जात असलेल्या दोन विद्यार्थिनी त्याच्या तडाख्यात सापडल्या. त्यांना किरकोळ मार लागला असल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना सुरक्षित स्थळी हलविले आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. या घटनेनंतर उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, उड्डाणपुलाच्या खालच्या भागाला यापूर्वीच तडे गेले होते. हे दोष दुरुस्त करण्याऐवजी संबंधित यंत्रणेने केवळ लोखंडी जाळी लावून तो भाग झाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मूळ बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने अखेर हा भाग कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून घटनेच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या अशा महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये दर्जाहीन काम करणार्‍या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण उड्डाणपुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

COMMENTS