Homeताज्या बातम्या

सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना सहआरोपी करून निलंबित करण्याची मागणीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांचे शिक्षण संचालक, उपसंचालक व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना सहआरोपी करण्यात यावे तसेच त्यांना तात

विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये क्रेनची बकेट निसटून १६००°C तापमानाचे वितळलेले लोह अंगावर पडल्याने ८ कामगारांचा जागीच मृत्यू!
बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
नांदेड रेल्वे विभागाची अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध विशेष मोहीम47 जणांवर कारवाई, 36,850 दंड वसूल
मध्य प्रदेश: ऑनलाइन गेम में हज़ारों रुपए गँवाने के बाद बच्चे ने की आत्महत्या - BBC News हिंदी



नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना सहआरोपी करण्यात यावे तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांना निवेदन सादर केले.
निवेदनात मारावार यांनी म्हटले आहे की, नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागात अनागोंदी कारभार, बेजबाबदार कार्यपद्धती आणि कथित आर्थिक देवाणघेवाणीमुळे विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. आत्महत्याग्रस्त शिक्षक सुनील मोरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या अडचणी व तक्रारी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासमोर वारंवार मांडल्या होत्या. मात्र, त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आणि निलंबनाची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक यांच्यातील वाद मिटविण्याऐवजी संबंधित प्रकरण अधिक चिघळण्यास प्राथमिक शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचा आरोपही मारावार यांनी निवेदनात केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना सहआरोपी करण्यात यावे व त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे.

COMMENTS