आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकपणाचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. मात्र, महावीर चौक परिसरातील व्यावसायिक संतोष अमीलकंठवार यांनी रस्त्यावर साप
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रामाणिकपणाचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. मात्र, महावीर चौक परिसरातील व्यावसायिक संतोष अमीलकंठवार यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे मालकापर्यंत पोहोचवत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
दुकान बंद करून घरी जात असताना संतोष अमीलकंठवार यांना रस्त्याच्या कडेला एक मोबाईल सापडला. मोबाईल स्वतःकडे न ठेवता त्यांनी तातडीने वजीराबाद पोलीस ठाणे गाठून तो पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी मोबाईलमधील उपलब्ध माहितीच्या आधारे मालकाशी संपर्क साधला. चौकशीनंतर हा मोबाईल कौशिक मोलणकळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक पडताळणीनंतर मोबाईल सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने कौशिक मोलणकळ यांनी संतोष अमीलकंठवार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत वजीराबाद पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांचे आभार मानले. या कार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, एएसआय शेख, पोलीस कॉन्स्टेबल मनीषा कदम आणि सत्यनारायण सुरनर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संतोष अमीलकंठवार यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या या वर्तनामुळे समाजात प्रामाणिकपणा, विश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

COMMENTS