Homeताज्या बातम्या

प्रवेश परीक्षांमधील टक्केवारी आणि पर्सेंटाइल : फरक समजून घेणे गरजेचे

स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या निकालानंतर टक्केवारी (झशीलशपींरसश) आणि पर्सेंटाइल (झशीलशपींळश्रश) या संज्ञांबाबत अनेकदा गैरसमज निर्माण होतात. टक्

किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश
महापालिकेची अर्थसंकल्पीय महासभा ३० जूनला; ५०० कोटींपेक्षा अधिक कराची वसुली थकली?
स्वारगेट बलात्कार प्रकरण : शिरूरमध्ये आरोपीसाठी सर्च ऑपरेशन
Understanding the Difference Between Percentage and Percentile



स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांच्या निकालानंतर टक्केवारी (झशीलशपींरसश) आणि पर्सेंटाइल (झशीलशपींळश्रश) या संज्ञांबाबत अनेकदा गैरसमज निर्माण होतात. टक्केवारी म्हणजे विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांचे प्रमाण, तर पर्सेंटाइल म्हणजे त्याच परीक्षेला बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थ्याचे स्थान.
अलीकडे सीईटी परीक्षेतील काही विद्यार्थ्यांना बारावीच्या तुलनेत अधिक पर्सेंटाइल मिळाल्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बोर्ड परीक्षा आणि स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा यांचे उद्दिष्ट, प्रश्नपत्रिकेचा स्तर आणि मूल्यमापन पद्धती वेगवेगळ्या असल्याने अशा प्रकारचा फरक दिसून येऊ शकतो. जेईईसह इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्येही अशी उदाहरणे आढळतात. तज्ज्ञांच्या मते, स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांची विश्लेषण क्षमता, अभिक्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि स्पर्धात्मक वातावरणातील कामगिरी तपासतात. त्यामुळे केवळ बारावीच्या टक्केवारीच्या आधारे प्रवेश परीक्षेच्या निकालाबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही. कोणत्याही प्रकरणाची अधिकृत चौकशी पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्यांबाबत तर्क-वितर्क करणे टाळावे. तथ्ये आणि अधिकृत माहितीच्या आधारेच चर्चा होणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

COMMENTS