नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार बोंढारकर यांचा वाढदिवस मार्कंड, जवळा आणि बोरगाव कोला येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांनी उ

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार बोंढारकर यांचा वाढदिवस मार्कंड, जवळा आणि बोरगाव कोला येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, शालेय साहित्य व खाऊ वाटप, धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
मार्कंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात बालाजी लामदाडे यांच्या पुढाकारातून 501 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर आ. बोंढारकर यांनी ऋषी मंदिरात दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. जवळा येथे ह.भ.प. शिवाजी महाराज बावस्कर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच माधव पावडे, सरपंच संतोष घाटोळ आणि उपतालुकाप्रमुख संभाजी पावडे यांनी केले. तसेच संभाजी पावडे यांच्या वतीने स्थानिक शाळेला दोन साऊंड बॉक्स व अॅम्प्लिफायर भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचेही वाटप करण्यात आले. याशिवाय जवळा येथे नामदेवराव शिखरे यांच्या वतीने, तर बोरगाव कोला येथील हनुमान मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना आमदार बोंढारकर म्हणाले, मतदारांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. जनतेने दिलेल्या प्रेमाची परतफेड विकासकामांच्या माध्यमातून करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्या शरीरात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सेवा करत राहीन. या कार्यक्रमांना शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, बालाजी पाटील पुणेगावकर, तालुकाप्रमुख अशोक मोरे, शहरप्रमुख तुलजेश यादव, सुहास खराणे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख बाळू पाटील मोरे, संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार, महानगरप्रमुख दीपक स्वामी, युवासेना तालुकाप्रमुख बालाजी सपुरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

COMMENTS