Homeताज्या बातम्या

18 व्या वर्ल्ड आर्निस चॅम्पियनशिपमध्ये कु. मनविता कोपलोडची दमदार कामगिरी; कांस्यपदकावर नाव कोरले

धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील रहिवासी तथा नांदेड विधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजरेड्डी कोपलोड यांची नात कु. मनविता राकेशरेड्डी क

कुंडलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश
नांदेड जिल्हा बँक निवडणूक: ’अशोकराव चव्हाणांच्या गडाला सुरुंग’; युवा नेत्यांचे ’बँक बचाव’ पॅनल मैदानात!
त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधार्‍यातील 0.2 टीएमसी पाणी तेलंगणातील श्रीरामसागरला सोडले



धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील रहिवासी तथा नांदेड विधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजरेड्डी कोपलोड यांची नात कु. मनविता राकेशरेड्डी कोपलोड हिने नवी दिल्ली येथे झालेल्या 18 व्या वर्ल्ड आर्निस चॅम्पियनशिप-2026 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे येताळा गाव, नायगाव मतदारसंघ तसेच नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वर्ल्ड एस्क्रिमा काली आर्निस फेडरेशन (थएघ-ऋ) आयोजित ही प्रतिष्ठेची स्पर्धा 2 ते 4 ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीतील टॉकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये पार पडली. या जागतिक स्पर्धेत फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, इंडोनेशिया तसेच भारतासह विविध देशांतील 250 हून अधिक अव्वल खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. तेलंगणातील हैदराबाद येथील श्री वेलोसिटी हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेणार्‍या कु. मनविताने अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये उत्कृष्ट कौशल्य, धैर्य आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांचा गौरव वाढला आहे. कु. मनविताच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी सुवर्णपदके जिंकून भारताचे नाव उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

COMMENTS